विजेला हात लावाल तर कायदा हातात घेऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेला हात लावाल तर कायदा हातात घेऊ
विजेला हात लावाल तर कायदा हातात घेऊ

विजेला हात लावाल तर कायदा हातात घेऊ

sakal_logo
By

इंदापूर, ता.२४ : ''''अतिवृष्टीमुळे जमिनींना तीन महिने वापसा नव्हता. यामुळे शेतीसाठी वीज वापरण्याचा प्रश्नच येत नाही. आता सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधात होते. तेव्हा सांगत होते की मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये भरले आणि शेतकऱ्यांना मोफत वीज दिली. आता तेच सत्तेत बसले की पांढरे फिके होतात. कोणतेही सरकार सत्तेत आले तरी शेतकऱ्यांचा बळी हा जाणारच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेला हात लावाल तर आम्ही कायदा हातात घेऊ,'''' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी थेट आमदारांसमोरच महावितरणसह राज्य सरकारला दिला.

महावितरणकडून सध्या इंदापूर तालुक्यात कृषी पंपाची वीज तोडणीची मोहीम सुरू आहे. शेतकऱ्याने थकबाकीसह चालू वीज बिले भरावीत असा तगादा महावितरण कडून लावला जातोय. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महावितरणचे अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली या बैठकीत घेतली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हाणी मांडत राज्य सरकारला थेट इशारा दिला.यावेळी अमरसिंह कदम यांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले.

खोक्याचे सरकार करतेय कार्यक्रम ओके
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम पुढे म्हणाले, जर वीज कंपनीचा कोणता अधिकारी वीस तोडण्यासाठी आला तर त्याच्या तोंडाला काळे फासू. खोक्याचे सरकार आमचा ओकेच कार्यक्रम करत आहे. यामुळे मायबाप सरकारला हात जोडून विनंती करतो की आमची वीज तोडू नका.