युवकांनी वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे : शहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकांनी वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे : शहा
युवकांनी वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे : शहा

युवकांनी वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे : शहा

sakal_logo
By

इंदापूर, ता.११ : ''''युवकांनी मोबाइलच्या आहारी न जाता गरजे पुरताच वापर करीत प्रत्यक्ष पुस्तक वाचन संस्कृती वाढविणे आवश्यक आहे,'''' असे प्रतिपादन
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक उद्योजक भरत शहा यांनी केले.
इंदापूर शहरात उद्योजक भरत शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी वृत्तपत्र वाचन केंद्र सुरू करण्यात आले. याच्या प्रारंभप्रसंगी शहा बोलत होते.
यावेळी शहा म्हणाले, नागरिकांना आपल्या परिसरात घडणाऱ्या चांगल्या घटनांची माहिती मिळत नाही. तसेच चांगले विचार व चांगले ज्ञान मिळणे अवघड झाले आहे. जागतिक स्तरावरील माहिती आपल्याला दैनंदिन वृत्तपत्र वाचनातून मिळत असते. त्यामुळे वाचन करणाऱ्यांना एक दिशा मिळत असते. म्हणूनच वाचन चळवळ वाचविणे, ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
यावेळी पोपट शिंदे, गजानन गवळी, अक्षय सूर्यवंशी, ललेंद्र शिंदे, सुनील अरगडे, बापू चव्हाण, जावेद शेख, अजिंक्य जावीर, सागर अरगडे, महेश कोकाटे, अख्तर कुरेशी, गणेश महाजन, प्रशांत उंबरे, अंगद शहा, शकील सय्यद, सुनील तळेकर, प्रमोद राऊत, बंडू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
-
इंदापूर शहरातील सरस्वतीनगर येथील बस स्थानक व गणपती मंदिर येथे पेपर वाचन बॉक्स बसविण्यात आले. तसेच व्यंकटेशनगर येथील बालाजी मंदिर परिसर, गणपती मंदिर, सावतामाळीनगरमध्ये सिद्धिविनायक मित्र मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ, खडकपूरा येथील गणपती मंदिर, नेताजीनगर ४० फुटी रोड येथील महादेव मंदिरालगत, कसबा येथे पोरापोरांची चावडी, शुक्ल वाडा, श्रीराम मंदिर, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठेनगर येथील अण्णाभाऊ साठे वाचनालयात व दत्तनगर येथील
गणपती मंदिर पाण्याच्या टाकी जवळ, तसेच वडरगल्ली येथील क्रांतिसिंह मित्र मंडळाच्या गणपती मंदिरामध्ये पेपर वाचन पेट्या बसविण्यात आल्या व त्याचे लोकार्पण भरत शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, सरस्वतीनगर भागातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना साडीचोळीचे वाटप व माऊली बालक आश्रम व मूकबधिर शाळा येथील शालेय विद्यार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
02527