Thur, Feb 2, 2023

इंदापुरात अवकाळी पावसाची हजेरी
इंदापुरात अवकाळी पावसाची हजेरी
Published on : 11 December 2022, 3:17 am
इंदापूर ता.११ : इंदापूर शहरात रविवारी (ता.११) सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. इंदापूर शहरात सकाळपासूनच थंड हवा व ढगाळ वातावरण होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला पावसाची चिंता सतावत होती आणि शेवटी त्यांची भीती खरी ठरली. सायंकाळी सातच्या दरम्यान इंदापूर शहर व परिसरातील गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तसेच रविवार हा इंदापूर शहरवासीयांसाठी आठवडे बाजाराचा दिवस असल्याने बाजारकरी यांचीही चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यामध्ये शेतकऱ्यांच्या द्राक्ष पिकाचे डाळिंब गहू हरभरा यांच्यासह कलिंगड खरबूज या पिकांनाही याचा फटका बसला आहे तर
वीटभट्टी चालकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
-
02535