खोरोची येथे अज्ञाताच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोरोची येथे अज्ञाताच्या 
हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
खोरोची येथे अज्ञाताच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

खोरोची येथे अज्ञाताच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

sakal_logo
By

इंदापूर, ता. १३ : खोरोची (ता. इंदापूर) येथे अज्ञातांनी वृध्द दांपत्याला गंभीर मारहाण केली. यामध्ये वृद्ध इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.
खोरोची येथे राहणाऱ्या दयाराम नारायण कणीचे आणि जनाबाई दयाराम कणचे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने सोमवारी रात्रीच्या सुमारास हल्ला केला. दुर्दैवाने उपचारा दरम्यान दयाराम कणीचे यांचा मृत्यू झाला. तर जनाबाई कणीचे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर बारामतीचे अपर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, प्रकाश पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांची दोन पथके मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.