इंदापुरातील मतदारांमध्ये उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरातील मतदारांमध्ये उत्साह
इंदापुरातील मतदारांमध्ये उत्साह

इंदापुरातील मतदारांमध्ये उत्साह

sakal_logo
By

इंदापूर, ता. १८ : इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी (ता. १८) मतदान प्रक्रिया काही किरकोळ वादावादी वगळता शांततेत पार पडली. अतिशय चुरशीने झालेल्या या मतदानात तालुक्यात एकूण ५७ हजार ७६० मतदारांपैकी ४८ हजार ३५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८३.७१ होती. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ७१ व या ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या २४६ सदस्यांपैकी बिनविरोध झालेले ३३ जागा वगळता २१३ जागांसाठी ४७२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीसाठी तालुक्यात ११९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. त्यासाठी राखीव कर्मचाऱ्यांसह ८४० कर्मचारी नियुक्त केले होते.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, सर्व मतदान अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले; तर पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.