
इंदापुरात आज ठरणार २६ ग्रामपंचायतींचे कारभारी
इंदापूर, ता.१९ : इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीने झालेल्या या गावपातळीवरील मतदानात तालुक्यात सरासरी ८३.७१ टक्के मतदान झाले. एकूण ५७७६० मतदारांपैकी ४८३५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी ७१ व या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २४६ सदस्या पैकी बिनविरोध झालेले ३३ जागा वगळता २१३ जागांसाठी ४७२ उमेदवारांचे मतदानरुपी भविष्य ईव्हीएम मशिनमध्ये बंदीस्त झाले होते. ते भविष्य आज (ता.२०) उघडणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
गाव.... मतदार संख्या....झालेले मतदान... टक्केवारी
१) पडस्थळ - १११९ - ९४८ - ८४.७२
२) हिंगणगाव- १३४३ - ११३७ - ८४.६६
३) अजोती-सुगाव - ११३२ - १००१ - ८८.४३
४) माळवाडी - ३२४३ - २६२२ - ८०.८५
५) पिंपरी खुर्द- शिरसोडी - २७८२ - २३८१ - ८५.५९
६) बिजवडी - ५२२२ - ४३०४ - ८२.४२
७) झगडेवाडी - ९७९ - ८६१ - ८७.९५
८) डाळज नं. २ - १२५३ - ११५० - ९१.७७
९) डाळज नं.३ - ७७६ - ६८७ - ८८.५३
१०) डाळज नं. १- १०३१ - ९३५ - ९०.६९
११) न्हावी - २८७४ - २४४५ - ८५.०७
१२) थोरातवाडी- ८३० - ७४९ - ९०.२४
१३) कळाशी - १७१३ - १४४७ - ८४.४७
१४) रणमोडवाडी - ३०२० - २३०४ - ७६.२९
१५) जांब - ११५९ - १०१९ - ८७.९२
१६) मानकरवाडी - ९५० - ८०० - ८४.२१
१७) कुरवली - २४७३ - २११२ - ८५.४०
१८) म्हसोबाचीवाडी - १५३८ - १३६५ - ८८.७५
१९) मदनवाडी - ४४९६ - ३६२७ - ८०.६७
२०) लाखेवाडी - ३७१८ - ३१५४ - ८४.८३
२१) बोरी- ४८६१ - ३७४८ - ७७.१०
२२) रेडणी - ३२९३ - २८५९ - ८६.८२
२३) बेलवाडी - ४२३१ - ३५३४ - ८३.५३
२४) डिकसळ - १२७९ - ११११ - ८६.८६
२५) गंगावळण - ६७० - ५५५ - ८२.८४
२६) सराटी - १७७५ - १४९६ - ८४.२८
- ५७७६० - ४८३५१ - ८३.७१