इंदापुरात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे
इंदापुरात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

इंदापुरात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

sakal_logo
By

इंदापूर, ता. १९ : युवती, महिलांवरील अन्याय अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यांनी स्वसंरक्षणासाठी समर्थ असणे आवश्यक आहे. संकटाचा धैर्याने सामना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बारामती निर्भया पथकाच्या पोलिस हवालदार अमृता भोईटे यांनी केले.
इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये महिला तक्रार आणि निवारण समिती अंतर्गत विद्यार्थिनींना महिला संरक्षण व सक्षमीकरण या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात भोईटे बोलत होत्या.
यावेळी बोलताना भोईटे यांनी विद्यार्थिनींनी आपले ध्येय समोर ठेवून पुढील आयुष्याची वाटचाल करावी. कुठे चुकीचे घडत असेल तर सहन न करता तत्काळ तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी प्राचार्य डॉ. राजकुमार वीर, पल्लवी चांदगुडे, पॉलिटेक्निकच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थिनींसह महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
प्रा. रोहिणी गोरे सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन महिला तक्रार आणि निवारण समितीच्या मुख्य प्रा. विद्युलता तावरे यांनी मानले.
-
02586