पडस्थळ ग्रामपंचायतीवर महिलाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडस्थळ ग्रामपंचायतीवर महिलाराज
पडस्थळ ग्रामपंचायतीवर महिलाराज

पडस्थळ ग्रामपंचायतीवर महिलाराज

sakal_logo
By

इंदापूर, ता. २१ ः इंदापूर तालुक्यातील उजनीच्या पट्ट्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या पडस्थळ येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेने गावचा कारभार महिलांच्या हाती दिला आहे. यामध्ये श्री. कोटलिंगनाथ ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय मिळविला आहे. सरपंच पदासाठी वैशाली पांडुरंग मारकड या विजयी झाल्या.
येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी वैशाली पांडुरंग मारकड व जिजा हनुमंत रेडके यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. यामध्ये वैशाली पांडुरंग मारकड शंभरहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. तर सदस्य पदाच्या सात पैकी सहा जागी विजय मिळवत श्री कोटलिंगनाथ ग्राम विकास पॅनेलने विजय मिळवीत ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली.
विजयी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये विद्या चंद्रकांत बोंगाणे, प्रियंका गणेश गव्हाणे, सपना राजेंद्र बोंगाणे, अश्विनी गोकूळ कोळेकर, बेगम दत्तू झेंडे, रेश्मा महेंद्र रेडके यांचा समावेश आहे. तर विरोधी गटाचे श्री कोटलिंगनाथ जनसेवा विकास पॅनेलच्या रोहिणी प्रमोद काळे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे गावातून सर्व महिला उमेदवार विजयी झाल्या. यामुळे ग्रामपंचायतीवर महिलाराज पाहायला मिळणार आहे.
पडस्थळ ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून सर्व निवडणुका या बिनविरोध होत्या. त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. पक्षिय राजकारणाला फाटा देत स्थानिक आघाडी करून दोन्ही गटांनी निवडणूक लढवली. यामध्ये विजयी झालेल्या श्री कोटलिंगनाथ ग्रामविकास पॅनेलच्या विजयासाठी पांडुरंग मारकड, हरिदास रेडके, सुग्रीव बोंगाणे, बळीकाका बोंगाणे, सुभाष बोंगाणे, महेंद्र रेडके, भारत बोंगाणे, अमोल कोळेकर यांनी परिश्रम घेतले.