
कांदलगाव येथे महिला ग्रामसंघ मेळावा
इंदापूर, ता. २३ ः इंदापूर तालुक्यातील कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत साऊ-जिजाऊ महिला ग्रामसंघ मेळावा संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू व इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट उपस्थित होते. या प्रसंगी सुरवातीला ग्रामपंचायत कार्यालयातील संविधान स्तंभाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शालिनी कडू यांच्या हस्ते वृक्षारोपण त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना शालिनी कडू म्हणाल्या, ‘‘कांदलगावात बचतगट चळवळ प्रभावीपणे चालू आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे, स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून एकमेकांना सहकार्य करून नवनवीन उद्योजिका पुढे यायला हव्यात, तरच उमेद अभियानाचा उद्देश सफल होईल. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले, ‘‘कांदलगाव पूर्वीपासून विविध उपक्रमात अग्रेसर आहे. आता महिलांनीसुद्धा छोटे-छोटे उद्योग सुरू करून स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. पंचायत समितीकडून बचतगटांना सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल.’’
यावेळी सरपंच रवींद्र पाटील, उपसरपंच कोंडाबाई जाधव, रेखा बाबर, तेजमाला बाबर, कमल राखुंडे, आशाबाई तुपसौंदर, किसन सरडे, उल्हास पाटील, विजय सोनवणे, बाळू गिरी, ग्रामसेविका स्वाती चव्हाण, पोलिस पाटील शैलजा पाटील, दशरथ बाबर, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रभू तरंगे, आरोग्यसेवक, उमेद अभियान तालुका व्यवस्थापक सचिन बाबर, राणी ननवरे, आदित्य मांधळे, अमर कदम, प्रशांत दीक्षित, निलोफर पठाण, लक्ष्मी कसबे, फातिमा शेख, स्वाती ननवरे, सायली पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी वन गट वन प्रॉडक्ट अभियानांतर्गत बचतगटांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आले होते, त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले. तर आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संतोष बाबर, राजू मदने यांनी प्रयत्न केले.
दरम्यान, रांगोळी आणि पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये पाककला स्पर्धेत संगीता विठ्ठल साखरे यांनी प्रथम, कोमल पोपट कारंडे यांनी द्वितीय, माधवी नवनाथ काशीद यांनी तृतीय तर उत्तेजनार्थ अर्चना शिवाजी मोरे यांनी पटकाविला.
तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक संगीता विठ्ठल साखरे, द्वितीय सायली प्रणव पाटील, तृतीय कोमल पोपट कारंडे व उत्तेजनार्थ -हसीना अजीज नायकुडे, माधवी नवनाथ काशीद या विजयी ठरल्या.
2624