माळवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळवाडी ग्रामपंचायतीवर 
राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता
माळवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता

माळवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता

sakal_logo
By

इंदापूर, ता. २२ : इंदापूर तालुक्यातील राजकीय घडामोडीत महत्त्वाची असलेल्या माळवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे यांच्या पत्नी व भैरवनाथ ग्राम विकास पॅनेलच्या उमेदवार मंगल बाळासाहेब व्यवहारे या सरपंचपदी विराजमान झाल्या; तर याच पॅनेलचे सदस्यपदाचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात राष्ट्रवादीला यश आले.
सदस्य पदाच्या ११ जागांपैकी ७ जागी सतीश भीमराव ठवरे, अश्विनी हरिभाऊ म्हेत्रे, विमल पांडुरंग गोफणे, बापू विजय व्यवहारे, वनिता भास्कर मदने, लक्ष्मी अधिक गडदे, पोपट संदीपान शिंगाडे हे सदस्य बिनविरोध झाले होते. तर, उर्वरित ४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये कासाबाई सखाराम गार्डे, गणेश बाबूराव भोंग, ज्ञानदेव पांडुरंग गार्डे, सारिका बाळू मोरे यांनी विजय मिळवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले.
या विजयामध्ये बाळासाहेब व्यवहारे, माळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रेय रायकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दीपक रायकर, माजी सरपंच नागनाथ व्यवहारे, महादेव व्यवहारे, माधव मोरे, साधू वलेकर, मदन बापू व्यवहारे, अक्षय व्यवहारे, सुहास सातपुते, निखिल व्यवहारे, गोकूळ व्यवहारे, सुभाष वलेकर, बापू ज्ञानदेव गार्डे, गोपाळ म्हेत्रे, भानुदास सातपुते यांनी मोठा वाटा उचलला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमदार दत्तात्रेय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करून गावचा समतोल विकास करण्यास कटिबद्ध आहे.
- मंगल बाळासाहेब व्यवहारे, सरपंच, माळवाडी (ता. इंदापूर)