बिजवडी येथे खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यक्रम उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिजवडी येथे खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यक्रम उत्साहात
बिजवडी येथे खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यक्रम उत्साहात

बिजवडी येथे खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यक्रम उत्साहात

sakal_logo
By

इंदापूर ता. ३० : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कर्मयोगी सहकारी साखर कारखाना यांचे संयुक्त विद्यमाने बिजवडी येथील लीलावती सांस्कृतिक भवन येथे एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान, खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यक्रम पार पडला. यावेळी कारखान्याचे संचालक अंबादास शिंगाडे, माजी संचालक मच्छिंद्र अभंग, कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब यादव, विलास बोराटे, प्रगतशील शेतकरी विजयसिंह बालगुडे, पांडुरंग मदने आदी उपस्थित होते. शंभर टन ऊस उत्पादन व पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराम लोकरे यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांनी एकरी शंभर टन उत्पादन येणे विषयी पंचसूत्री सांगितली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाळासाहेब यादव यांनी केले. यावेळी परिसरातील दोनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते.