गागरगाव येथे भरला आठवडे बाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गागरगाव येथे भरला आठवडे बाजार
गागरगाव येथे भरला आठवडे बाजार

गागरगाव येथे भरला आठवडे बाजार

sakal_logo
By

इंदापूर, ता. ३१ : ग्रामीण भागातील मुलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान व्हावे तसेच मुलांना व्यवसायाची ओळख व पैसे देवाण-घेवाण समजण्यासाठी इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. या बाजारात आर्थिक उलाढाल झाल्याने विद्यार्थांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळाले. या बाजारात खरेदीसाठी गावातील पालक वर्ग तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे शाळेचा परिसर गर्दीने गजबजला होता. लहान मुले बाजारातील वस्तू, फळे, भाज्या यांची विक्री करीत असताना पालक अतिशय कुतूहलाने पाहत बाजारात खरेदी करीत होते. या वेळी औदुंबर कचरे, आबा वीर, ग्रामपंचायत सदस्य पोपट गलांडे, आजिनाथ कचरे, देविदास वीर, नवनाथ कचरे, रामदास जाधव, भारत जाधव, संतोष मिंड, धर्मराज धुमाळ, बाळासाहेब नरळे, देविदास वीर, नितीन मिंड, गणेश भोसले, तात्याराम सातव, नाना धुमाळ, बापू धुमाळ, अरुण शिंदे, बाळू शिंदे, नाना भोसले, उमेश पवार, संजय नरळे, काळू आगवणे, अनिल धुमाळ, महेश धुमाळ, अमोल सातव आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक वसंत फलफले, शिक्षिका मंदाकिनी हेबाडे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक वर्ग यांनी परिश्रम घेतले.