Mon, Jan 30, 2023

काटी, रेडणी येथे दारू जप्त
काटी, रेडणी येथे दारू जप्त
Published on : 31 December 2022, 4:11 am
इंदापूर, ता. ३१ : इंदापूर तालुक्यातील काटी व रेडणी येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला (३१ डिसेंबर) देशी-विदेशी व हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई करत १८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत इंदापूरचे पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या आदेशाने काटी येथील दोन व रेडणी येथील एका व्यक्तीच्या राहत्या घरी छापा टाकून देशी विदेशी व अवैध हातभट्टी दारू जप्त केली. या कारवाईत एकूण १८ हजाराचा ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, सहायक फौजदार के. बी. शिंदे, महिला पोलिस हवालदार लडकत, पोलिस अमोल गायकवाड, पोलिस शिपाई दिनेश चोरमले व मोहन आनंदगावकर यांनी कारवाई केली.