नारायणदास रामदास प्रशालेत बालिका दिनानिमित्त उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणदास रामदास प्रशालेत
बालिका दिनानिमित्त उपक्रम
नारायणदास रामदास प्रशालेत बालिका दिनानिमित्त उपक्रम

नारायणदास रामदास प्रशालेत बालिका दिनानिमित्त उपक्रम

sakal_logo
By

इंदापूर, ता. ५ ः इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची प्रकाश देणाऱ्या पणतीची बैठक व्यवस्था सर्वांचे आकर्षक ठरली.

यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी प्रतिमा पूजन केले, तर काही मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतून सावित्रीबाईंच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. यामध्ये जिजाऊ चौबे, स्वरा बोराटे, स्वरा वाचकवडे, ईशानी पवार, ईश्वरी ननावरे, हिंदवी बोडके, सार्थक पवळ, दिपीक्षा साळवे, अक्षरा बनकर, हर्षदा कदम, अक्षरा मगर आणि राजलक्ष्मी गुरगुडे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रशालेतील सर्व बालिकांनी मिळून मानवी प्रतिकृतीमधून पणतीचा आकार साकारला होता. या पणतीच्या माध्यमातून शिक्षणाच्या ज्ञानज्योतीचा संदेश देण्याचा प्रयत्न बालिकांनी केला.
कार्यक्रमाची सांगता संतोषी बनकर यांनी घेतलेल्या बालिका दिन प्रतिज्ञेने करण्यात आली.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया कदम यांनी, शिक्षक मनोगत आशा नझरकर यांनी, सोनाली कासेंगावकर आणि पूनम जाधव यांनी उत्कृष्ट फलकलेखन केले.
-