इंदापुरात एकाला धमकी देत 
जीवे मारण्याचा प्रयत्न

इंदापुरात एकाला धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न

इंदापूर, ता. २७ ः ''आमच्या गावातून ट्रॅक्टर घेऊन जायचा नाही अन्यथा वाईट परिणाम होतील'' अशी धमकी देत एका ट्रॅक्टर मालकाला ९ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना इंदापूर तालुक्यात घडली.
२६ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या नीरा भीमा कारखाना चौकात घडलेल्या या घटनेबाबत जीवन ज्ञानदेव जाधव (रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गौरव दत्तात्रेय देवकर, रोहित दत्तात्रेय देवकर, अक्षय सुरेश देवकर (सर्व रा. रेडा, ता. इंदापूर) यांच्यासह अनोळखी सहा जणांच्या विरोधात इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ट्रॅक्टर चालक असून मशागत करण्यासाठी आमच्या गावात यायचं नाही अशी धमकी वारंवार वरील आरोपींकडून दिली जात होती. दरम्यान या आरोपींनी फिर्यादीला गुरुवारी संबंधित ठिकाणी येण्याची, न आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. घाबरून नीरा भीमा चौकात आलेल्या फिर्यादीला या तरुणांनी दमदाटी शिवीगाळ करत धारदार हत्यारांनी मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.
दरम्यान घटना घडल्याच्या काही वेळातच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी फिर्यादी जीवन जाधव यांची इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. तसेच आरोपी पकडण्यासाठी त्वरित सूत्रे हलवली. त्यानुसार या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती नागनाथ पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com