
राज्य पुरस्काराने १४ विद्यार्थी सन्मानित
शिर्सुफळ : ता : ३१ : सावळ (ता.बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमधील १४ विद्यार्थी राज्य पुरस्कार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेतर्फे २०२२-२३ या वर्षात राज्य स्तरावर राज्य पुरस्कार परीक्षा शिबिराचे २२ ते २५ जानेवारी या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग (भोर) जि. पुणे येथे आयोजन केले होते. या परीक्षेत पुणे, सोलापूर आणि नगर या जिल्ह्यातू ३७४ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये दिव्या आटोळे, आदिती चव्हाण, सिध्दी चव्हाण, वैष्णवी चव्हाण, प्राची ठोंबरे, सानिका झारगड, वैष्णवी शिंदे, यश निगडे, अविष्कार देवकर, कार्तिक निंबाळकर, आदेश मासाळ, विनय आटोळे, प्रेमजीत सायकर, दिशांत शेलार या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, पल्लवी सांगळे, संपत जायपत्रे, गोरख वनवे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रेय शिंदे, नीलिमा देवकाते, राधा नाळे, स्वप्नाली दिवेकर आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक वर्ग यांनी कौतुक केले.
02928