''इंदापूरसाठी उन्हाळी आवर्तन खडकवासला कालव्यातून सोडा'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''इंदापूरसाठी उन्हाळी आवर्तन खडकवासला कालव्यातून सोडा''
''इंदापूरसाठी उन्हाळी आवर्तन खडकवासला कालव्यातून सोडा''

''इंदापूरसाठी उन्हाळी आवर्तन खडकवासला कालव्यातून सोडा''

sakal_logo
By

इंदापूर, ता.१६ : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी हंगामातील आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदाकडे केले आहे. याबाबत त्यांनी जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
खडकवासला साखळी धरणामध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर शेतामध्ये ऊस व इतर पिके उभी असून दररोज तापमानात वाढ होत चालल्याने पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे खडकवासला कालव्यातून आवर्तन सोडल्यास उभ्या पिकांना यांचा फायदा होणार आहे. तसेच आवर्तन सोडल्यास लाभक्षेत्रातील तलावांमध्ये पाणी सोडता येईल.याचा पिण्याच्या पाणी योजनाही फायदा होईल.
खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रात इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे, निरगुडे, पिंपळे, पोंधवडी, अकोले, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, डाळज, रुई, न्हावी, लोणी देवकर, बळपुडी, कौठळी, खामगळवाडी, बिजवडी, पोंदकुलवाडी आदी अनेक गावे येतात. खडकवासला कालव्यातून आवर्तन सोडण्याबाबत लवकरच नियोजन केले जाईल, असे आश्वासन जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिले आहे.


03054