इंदापूर येथे इंद्रेश्वर रथयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर येथे इंद्रेश्वर रथयात्रा
इंदापूर येथे इंद्रेश्वर रथयात्रा

इंदापूर येथे इंद्रेश्वर रथयात्रा

sakal_logo
By

इंदापूर, ता. १८ ः इंदापूर येथील श्री इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त पूर्वसंध्येला आयोजित रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रारंभी इंदापूर ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवस्थानची यात्रा संकल्प पूजा, आरती, इंद्रेश्वर देवस्थानचे ध्वज व रथ यांची विधिवत पूजा ट्रस्टचे प्रमुख राजाभाऊ वाशिंबेकर, शैलजा वाशिंबेकर, मुकुंदशेठ शहा, अंकिता शहा, अजिंक्य इजगुडे व अश्विनी इजगुडे या उभयतांच्या हस्ते श्रीकांत गुरव, गिरीश गुरव यांनी विधिवत पूजा केली.
यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर यांच्या हस्ते महाआरती होऊन रथ ओढण्यास सुरुवात केली. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे यांनी ही इंद्रेश्वराचे दर्शन घेऊन रथाच्या मिरवणुकीत सहभागी होत हलगीच्या निनादात भन्नाट डान्स करत सर्वांचे लक्ष वेधले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, संदीप वाशिंबेकर, दादासाहेब पिसे, शेखर पाटील, रघुनाथ राऊत, पोपट पवार, धीरज शहा, अमित जौंजाळ, देवराज देशमुख, प्रकाश शिंदे, रघुनाथ खरवडे, भारत बोराटे, महादेव चव्हाण, अतुल शेटे पाटील, श्रीनिवास बानकर, आस्वाद जौंजाळ, धनंजय पाटील, शकील सय्यद, अमर गाडे, अनिकेत वाघ, अविनाश कोथमिरे, भावेश ओसवाल यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यावेळी पारंपरिक वाद्य, हलगीचा निनाद, विविध मुखवटे परिधान केलेल्या सजावटी, महिलांचा दांडिया, टाळ मृदंगाचा गजर, रस्त्यावरच्या रांगोळी, फटाक्यांची आतषबाजीमध्ये व सजवलेल्या रथाची शाही मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शनिवारी महाशिवरात्रीनिमित्त इंद्रेश्वर महादेव रुद्राभिषेक, महाशिवरात्री अष्ट प्रहर पूजा, श्री रुद्राभिषेक संपन्न झाला. मध्यरात्री श्री इंद्रेश्वर महादेव बेलपत्र अर्पण सोहळा तर रविवारी 10 ते 12 या वेळेत ओंकार महाराज जौंजाळ यांचे काल्याचे कीर्तन यानंतर महाआरती महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्यासह आजी- माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.