Thur, June 1, 2023

इंदापूर येथे निवडणूक आयोगाच्या स्वागत
इंदापूर येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत
Published on : 20 February 2023, 8:14 am
इंदापूर, ता. २० : येथे बाबासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे पेढे वाटून व फटाक्यांचे आतिषबाजी करून घोषणा देत स्वागत केले. तसेच पक्ष कार्यालयाचे शिवसेना पक्ष कार्यालय असे नामकरण ही केले.
यावेळी शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर, शहर प्रमुख अशोक देवकर, युवा सेना तालुका अधिकारी अण्णासाहेब काळे, उपतालुका प्रमुख बबन खराडे, वसंत आरडे, दुर्वास शेवाळे, दादाराम शिंदे, किरण काळे, सूरज काळे, बालाजी पाटील, सागर आवटे, निर्मला जाधव आदी उपस्थित होते.