इंदापुरात शीघ्र कृती दलाचे संचलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात शीघ्र कृती दलाचे संचलन
इंदापुरात शीघ्र कृती दलाचे संचलन

इंदापुरात शीघ्र कृती दलाचे संचलन

sakal_logo
By

इंदापूर ता.२१ : भारत सरकारच्या केंद्रीय राखीव दल (सीआरपी) बरोबर संलग्न असलेले शीघ्र कृती दल (रॅपिड अॅक्शन फोर्स) मंगळवारी (ता.२१) सकाळी इंदापूर शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यामुळे नागरिकांत काही काळ घबराटीचे आणि नंतर औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले. कारण या पथकाने कायदा सुव्यवस्था, निवडणुका व सन उत्सव या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यातील बावडा गावातून संचलन करीत शांततेचा संदेश दिला.
शीघ्र कृती दलाचे (रॅपिड अॅक्शन फोर्स) तलोजा नवी मुंबई येथील अधिकाऱ्यांसह एकूण ६० कमांडो यामध्ये सहभागी होते. या पथकाने इंदापूर शहरातून संचलन करीत संवेदनशील भागाबरोबरच देवस्थान परिसराची माहिती घेतली. यानंतर हे बटालियन तालुक्यातील बावडा येथे संचलन करीत पुढे बारामती कडे मार्गस्थ झाले. या बटालीयनचे नेतृत्व उप कमांडेड माओतोशी, सहाय्यक कमांडेड श्रीमती स्वाती तांदळे, पोलिस निरीक्षक पवन कुमार, सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती सुशीला या अधिकाऱ्यांनी केले.
यावेळी इंदापूर शहर - बाबा चौक-एसटी स्टँड- दर्गा मज्जिद चौक- कुरेशी गल्ली -आंबेडकर नगर- नेहरू चौक -मेन पेठ खडकपुरा शिवाजी चौक -वेंकटेश नगर- इंदापूर पोलिस स्टेशन असा रूट मार्च घेण्यात आला. तसेच बावडा दूरक्षेत्र हद्दीमध्ये बावडा गावामध्ये रूट मार्च घेण्यात आला यावेळी इंदापूर पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, नागनाथ पाटील पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडोळे, महिला पोलिस उपनिरीक्षक अपर्णा जाधव याचेसह इंदापूर पोलीस स्टेशनचे ३० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
-
03131