इंदापुरातील ११ केंद्रावर १३ पथकांचा वॉच

इंदापुरातील ११ केंद्रावर १३ पथकांचा वॉच

इंदापूर, ता. २१ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १२वी शालान्त परीक्षेस मंगळवार (ता.२१) रोजी सुरूवात झाली. यामध्ये इंदापूर तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रावर ५,७५८ विद्यार्थी परीक्षा देण्यास पात्र आहे. दरम्यान परीक्षा कॉपी विरहित सुरळीत पार पडाव्यात यासाठी १३ भरारी पथकांची नेमणूक केल्याची माहिती इंदापूर तालुका गट शिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी दिली.
कोव्हिडनंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. इंदापूर तालुक्यामध्ये कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे ७८७, नंदिकेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जंक्शन येथे ४०९, श्री. पळसनाथ हायस्कूल पळसदेव येथे ३५३, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भिगवन येथे ३९०, कोंडिराम सदाशिव क्षिरसागर ज्युनिअर कॉलेज भिगवन येथे ५७०, एन. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर येथे २७१, वालचंद विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज कळंब येथे ६४७,
श्री वर्धमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वालचंदनगर येथे ३४३, श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे ३१४ , कै. साहेबराव फडतरे ज्युनिअर कॉलेज कळंब येथे ७२८, श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर येथे ९४६ अशा एकूण ११ केंद्रांवर ५, ७५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेस नोंदणी केली आहे. दरम्यान, विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com