सुगाव येथे वाळू माफियांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुगाव येथे वाळू माफियांवर कारवाई
सुगाव येथे वाळू माफियांवर कारवाई

सुगाव येथे वाळू माफियांवर कारवाई

sakal_logo
By

इंदापूर, ता.२३ : उजनी पाणलोट क्षेत्रातील सुगावच्या (ता. इंदापूर) हद्दीत नदीपात्रात इंदापूर पोलिसांनी बुधवारी (ता.२२) मध्यरात्री अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले. यावेळी वाळू वाहतूक करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी दोन फरार झाले असून, सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वाळू काढण्यासाठी वापरात येणाऱ्या दोन यांत्रिक बोटी, दोन सक्शन बोटी, २४ ब्रास वाळू असा एकूण ४२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाळू उपशाप्रकरणी दोन स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या आहेत. अटक केलेले सर्व आरोपी मूळचे झारखंड राज्यातील आहेत. मन्सूर रेहमान पलटू शेख (वय ४६), आश्रफ कालु शेख, (वय २०), रहीम इस्माईल शेख (वय २९), महादेव व्यवहारे (सर्व रा. माळवाडी नं.२, इंदापूर), हैतुल अली अकुमुद्दीम शेख (वय ३२) असीम बबलु शेख (वय २१), रेजाऊल अफजल शेख (वय २५), समजाद अजहर शेख (वय ४६, सर्व रा. टेंभुर्णी, ता.माढा, जि. सोलापूर), युवा फलफले (रा.गलांडवाडी नं.१ ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. महादेव व्यवहारे व देवा फलफले हे फरारी आहेत .पोलिस कर्मचारी विक्रम घळाप्पा जमादार व पोलिस कर्मचारी लक्ष्मण निळकंठ सूर्यवंशी यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी यांत्रिक बोटीद्वारे उजनी पाणलोट क्षेत्रातील सुगाव गावच्या नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन करत आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप पवार आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, पोलिस कर्मचारी विक्रम जमादार, लक्ष्मण सूर्यवंशी, गजानन वानोळे यांनी शासकीय बोटीतून त्यांचा पाठलाग करत सुगावपासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांना पकडले.