इंदापूर येथे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर येथे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी
इंदापूर येथे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

इंदापूर येथे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

sakal_logo
By

इंदापूर ता. २४ : इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजित संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार, तर तथागत गौतम बुद्ध व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे आदी उपस्थित होते. यावेळी नानासाहेब सानप म्हणाले, ‘‘देव दगडात नसून तो माणसात आहे, हे गाडगेबाबांनी सर्वसामान्य माणसाच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वच्छतेचा संदेश देताना स्वतः आधी अनुकरण करून लोकांना सांगितले.’’