घरकुल पूर्ण करण्याबाबत प्रोत्साहित करा

घरकुल पूर्ण करण्याबाबत प्रोत्साहित करा

इंदापूर, ता. २८ : ‘‘इंदापूर तालुक्यामध्ये अपूर्ण घरकुल असलेल्या लाभार्थ्यांचे ग्रामपंचायत स्तरावर मेळावे घेऊन त्यांना घरकुल पूर्ण करण्याबाबत प्रोत्साहित करावे व आवश्यक त्या सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचे कामकाज आढावा बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी आयुष प्रसाद बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्तार अधिकारी तेजस जगताप यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, रोजगारसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसाद म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यामध्ये एक हजारहून अधिक घरकुलाचे काम अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झालेले असतानाही कामच सुरू केलेले नाही. सदर काम मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी व प्रशासन यांच्याकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. ३१ मार्चपर्यंत अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने नियोजन करावे. तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींअंतर्गत १००० पेक्षा जास्त घरकुले अपूर्ण आहेत. त्याबाबत उपाययोजना करून संबंधितांची घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावे व आठ मार्च या जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून मोठ्या प्रमाणावर गृहप्रवेश उपक्रम राबवावा.’’

ज्यांची घरकुले प्रगतिपथावर आहेत, मात्र बांधकाम साहित्यामुळे अपूर्ण आहेत, त्यांना घरकुलांना लागणारे वीट, सिमेंट, वाळू आदी साहित्य मिळवून देण्याबाबत नियोजन करावे. ज्यांनी अद्याप घरकुलाला सुरवातच केली नाही, त्यांच्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ मशिनद्वारे पाया खोदणे करण्याबाबत नियोजन करत लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी पुढाकार घ्यावा.
- आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com