
बावडा परिसरातील हातभट्टीवर कारवाई
इंदापूर, ता. १ : बावडा (ता. इंदापूर) येथे बुधवारी (ता. १) पहाटे अवैध बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी कारवाई केली. यामध्ये ४ जणांवर गुन्हे दाखल करत २ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
इंदापूरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीआधारे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत बुधवारी (ता. १) सकाळी ५ वाजता बावडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ४ जणांवर छापा मारून मानवी शरीरास अपायकारक अशा रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे ३ बॅरल, दोनशे लिटरचे १२ बॅरल, शंभर लिटरचा १ बॅरल व इतर साहित्य, असा एकूण २ लाख ४९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. सहाय्यक फौजदार के. बी. शिंदे, महिला पोलिस हवालदार खंडागळे, पोलिस नाईक अमोल गायकवाड, सुनील कदम, अप्पा हेगडे, लखन साळवी पोलिस शिपाई विकास राखुंडे, विनोद काळे, समाधान केसकर यांनी कारवाईत भाग घेतला.