Wed, May 31, 2023

वरकुटे येथे नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद
वरकुटे येथे नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद
Published on : 9 March 2023, 11:11 am
इंदापूर, ता. ९ : जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत वरकुटे बुद्रुक व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्यावतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ११६ जणांची तपासणी केली. तसेच अष्टविनायक ऑप्टिकल बारामती यांच्यावतीने ४२ जणांना अल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. तर १३ जणांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील भारती हॉस्पिटल येथे पाठविण्यात येणार आहे. या वेळी सरपंच पुनम सोनवणे, रवींद्र खटके, एम. एच. टोपे, नेत्र चिकित्सक शरद शिर्के, सहाय्यक अजित थोरात उपस्थित होते.