वकिली व्यवसायात सामाजिक बांधिलकी जपा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वकिली व्यवसायात सामाजिक बांधिलकी जपा
वकिली व्यवसायात सामाजिक बांधिलकी जपा

वकिली व्यवसायात सामाजिक बांधिलकी जपा

sakal_logo
By

इंदापूर, ता. ९ : ''''वकिलांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग हा फक्त पैसे कमावण्यासाठी न करता गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केला पाहिजे. सातत्याने आपली गुण कौशल्य वाढविण्याकडे व कायद्याच्या अभ्यासाकडे लक्ष देत वकिली व्यवसायात कायम सामाजिक बांधिलकी जपावी,'''' असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
इंदापूर न्यायालयामध्ये इंदापूर वकील संघटनेच्या वतीने न्यायाधीश संजय देशमुख यांचा सत्कार समारंभ व कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. इंदापूर न्यायालयामध्ये वकील संघटने करिता मिळालेल्या नूतन विधीज्ञ कक्षाचे उद्‌घाटन व लोकार्पण देशमुख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी बारामती येथील मुख्य अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे.पी.दरेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर येथील मुख्य न्यायाधीश पी.एल.पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमास पुणे, इंदापूर, बारामती, दौंड, माढा, माळशिरस, करमाळा, खडूस, खटाव, फलटण, येथील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष मनोहर चौधरी, उपाध्यक्ष जमीर मुलाणी, उपाध्यक्ष सुभाष भोंग, सचिव आशुतोष भोसले, महिला प्रतिनिधी प्रिया शिंदे-मखरे, खजिनदार राजू ठवरे, ग्रंथपाल रवींद्र कोकरे व सदस्य रुद्राक्ष मनसे यांचेसह इंदापूर वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. यावेळी ॲड.के.डी.यादव यांनी प्रास्ताविक, ॲड.सचिन चौधरी यांनी सूत्रसंचालन तर ॲड.आशुतोष भोसले यांनी आभार मानले.
-
03261