फुले प्रहार संस्थेचे कार्य कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुले प्रहार संस्थेचे कार्य कौतुकास्पद
फुले प्रहार संस्थेचे कार्य कौतुकास्पद

फुले प्रहार संस्थेचे कार्य कौतुकास्पद

sakal_logo
By

इंदापूर, ता. ११ : पूर्वी समाजात एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळीच विवाहाचे निर्णय घ्यायचे. परंतु सध्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातील जाणत्या मंडळींकडे दुर्लक्ष होत आहे. अपेक्षीत स्थळे शोधण्यासाठी पालकांना मौलिक वेळ वाया घालवून सुद्धा इच्छित स्थळे उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी माळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा आयोजित करून, विवाह इच्छुकांची मोफत नाव नोंदणी करत वधू-वरांची इच्छित स्थळे उपलब्ध करून देणाऱ्या फुले प्रहार सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ॲड.समीर टिळेकर यांनी केले.
इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने माळी समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेले माळवाडी येथील विकास तुकाराम व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ३३५ वधू-वरांनी नाव नोंदणी केली.

यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र पंचायत ग्राम विकास विभाग प्रमुख युवराज म्हस्के, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश व्यवहारे, माजी संचालक अतुल व्यवहारे, तात्यासाहेब वडापुरे, बाबासाहेब भोंग, अॅड. नितीन राजगुरू, नागनाथ व्यवहारे, अतुल झगडे, पोपटराव धवडे, छाया पडसळकर, वर्षाताई भोंग, रेश्मा शेख, स्मिता पवार आदी उपस्थित होते.

माळी समाज वधू-वर परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी फुले प्रहारचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे, उपाध्यक्ष चंद्रकांत बोराटे, गणेश जाधव, बापू बोराटे, रवींद्र म्हेत्रे, अशोक देवकर, संतोष नेवसे, संजय राऊत, बबन खराडे, दादासाहेब गोरे, विकास म्हेत्रे, सुयोग गायकवाड, यांनी प्रयत्न केले. संतोष नरूटे यांनी सूत्रसंचालन केले. बबन खराडे यांनी आभार मानले.
-
03265