
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस इंदापूर पोलिसांकडून अटक
इंदापूर, ता. ९ : वर्षभरापूर्वी झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस इंदापूर गुन्हे शोध पथकाने अटक करत त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.
राजेंद्र तानाजी पवार (रा. रणगाव, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून सन २०२२ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी इंदापूर गुन्हे शोध पथकाला मार्गदर्शन करीत आरोपी सोमनाथ विष्णू राऊत (वय ३२, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल, एक मोबाईल फोन व सोन्याची दीड ग्रॅम वजनाची बाळी हस्तगत केली. त्यास न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.
तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, सुधीर पाडूळे, पोलिस हवालदार प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, पोलिस नाईक सलमान खान, पोलिस अंमलदार नंदू जाधव, लक्ष्मण सूर्यवंशी, दिनेश चोरमले यांनी केली.
-