
जैनकवाडीत शिवराय, ज्ञानज्योतींच्या प्रतिमेचे पूजन
शिर्सुफळ : ता : १३ : जैनकवाडी (ता. बारामती) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने शिवरायांची पालखी काढण्यात आली होती. तसेच शिवराय तसेच सावित्रीबाई फुले यांच्या देखील प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानेश्वर जगताप यांनी तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्राम संघाच्या अध्यक्षा ललिता सूर्यवंशी यांनी केले. त्याचबरोबर विश्वजीत पवार यांनी महाराज यांच्या विषयी आपले विचार मांडले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार दिंडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे स्वप्नील पवार, कल्याण ननवरे, प्रशांत माने यांनी आयोजन केले होते. ज्ञानेश्वर जगताप प्रस्तुत होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पडला. होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी महिलांना सहभागी होण्यासाठी सुरेश हिटे यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या महिलांना पारितोषिक देखील देण्यात आले. कार्यक्रमांमध्ये अन्नदान करण्याचे काम गावचे सरपंच संदीप शेंडे यांनी केले. शंकर सूर्यवंशी आणि विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.
03286