इंदापूरच्या गढी संवर्धनासाठी मंत्रालयात बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरच्या गढी संवर्धनासाठी मंत्रालयात बैठक
इंदापूरच्या गढी संवर्धनासाठी मंत्रालयात बैठक

इंदापूरच्या गढी संवर्धनासाठी मंत्रालयात बैठक

sakal_logo
By

इंदापूर, ता. २० : इंदापूर येथील वीरश्री मालोजीराजे गढी व स्मारक संवर्धनासाठी जास्तीत जास्त रकमेचा आराखडा तयार करणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांचे वास्तव्य असलेल्या इंदापूर शहरातील गढी व स्मारकाच्या संवर्धनाची आग्रही मागणी विधानसभेत मांडली होती. यावर पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी, आमदार भरणे यांच्यासोबत सदर विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरात लवकर संयुक्त बैठक घेणार असल्याचे विधानसभेत आश्वासित केले होते. त्यानुसार सोमवारी (ता. २०) मंत्रालयात लोढा यांनी आमदार भरणे आणि ऑनलाइनच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसमवेत संयुक्तरित्या बैठक घेतली. पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी. जी. पाटील, इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री लोढा यांनी गढीची एकूण जागा किती आहे? त्यासंबंधीच्या सर्व इतिहास बाबींच्या नोंदीची माहिती व अतिक्रमण किती आहे, याचा संक्षिप्त अहवाल लवकरात लवकर पर्यटन विभागाच्या संबंधित कार्यालयास सादर कराव्यात, अशी सूचना केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी वास्तु विशारद सुनीता तावरे यांनी स्मारक व गढीची भविष्यातील प्रतिकृती दाखवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.