बारामती, इंदापुरात उद्या भाजप शाखांची उद्‍घाटने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती, इंदापुरात उद्या 
भाजप शाखांची उद्‍घाटने
बारामती, इंदापुरात उद्या भाजप शाखांची उद्‍घाटने

बारामती, इंदापुरात उद्या भाजप शाखांची उद्‍घाटने

sakal_logo
By

इंदापूर, ता. २४ : भाजपकडून मिशन बारामतीला पुन्हा बळ देण्यात येत आहे. त्यानुसार युवा मोर्चा व युवा वॉरिअर्स यांच्या माध्यमातून इंदापूर, बारामती व कर्जत-जामखेड (जि. नगर) मतदारसंघात रविवारी (ता. २६) ५२ शाखांचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक काटे यांनी दिली.
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेस भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष शरद जामदार, दीपक काटे, शहराध्यक्ष शकील सय्यद, इंदापूर युवा मोर्चा अध्यक्ष तेजस देवकते आदी उपस्थित होते. यावेळी काटे म्हणाले, ‘‘बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर व बारामती तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या शाखांचे उद्‍घाटन व जाहीर सभा, असा कार्यक्रम रविवारी होणार आहे. त्यासाठी बावनकुळे, गोपीचंद पडळकर, मुरलीधर मोहोळ, राहुल लोणीकर, हर्षवर्धन पाटील, गणेश भेगडे, या प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, सायंकाळी पाच वाजता इंदापूर येथील नगरपरिषदेसमोरील मैदानावर जाहीर सभा होणार आहे.