Sat, June 3, 2023

डॉ. सलीम मोमीन यांचे निधन
डॉ. सलीम मोमीन यांचे निधन
Published on : 26 March 2023, 1:06 am
इंदापूर : इंदापूर शहरातील गरिबांचे आरोग्यदूत म्हणून ओळख असलेले डॉ. सलीम हाशम मोमीन (वय ६५) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी गोरगरीब रुग्णांसाठी अखंड सेवा केली. त्यांच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.