उंडवडी कडेपठारच्या माळरानावर गजग्याच्या झाडांना बहर

उंडवडी कडेपठारच्या माळरानावर गजग्याच्या झाडांना बहर

शिर्सुफळ : ता : २७ : पारंपरिक ग्रामीण उपचारांमध्ये हमखास गजग्याचा वापर होत असे. अनेक आजारांवर गुणकारी असणारा गजग्याचा आर्युवेदामध्ये देखील मोठे महत्त्व आहे.या झाडांना उंडवडी कडेपठारच्या माळरानावर बहर आला आहे.
आयुर्वेदात महत्त्व दिवसेंदिवस जाणवते असल्याने सध्या जग पुन्हा आयुर्वेदिक उपचारांकडे वळताना दिसत आहे. मात्र, ही औषधी वनस्पती आता दिवसेंदिवस नामशेष होत चालली आहे. गजगा ही भारतात उगवणारी एक सदाहरित बहुवर्षीय आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तीन वर्षांपासून बी मिळण्यास सुरुवात होते आणि पंचवीस ते तीस वर्ष बी मिळत राहते. अनेक आजारांवरती हे एक महत्वाचे औषध असल्यामुळे आजीबाईच्या बटव्यात गजगे हमखास असायचे. लहान मुलांच्या बाळगुटीत देखील याचा वापरला केला जातो. औषध करण्यासाठी मुळाची साल, पाने, फुले आणि बी यांचा वापर केला जातो. याचे काटेरी वेलासारखे झुडूप असल्याने वन्यप्राण्यांपासून शेताच्या कुंपणासाठी देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. झाडांच्या खोडावर, फांद्यांवर, पानाच्या व फुलांच्या देठावर वाकडे काटे असतात. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान याची फळे परिपक्व होतात. एका फळामध्ये दोन बिया असतात. याची चव कडू, तुरट, तिखट असून हे बी उष्ण व हलके असते.

आरोग्यदायी गुणधर्म
मधुमेह, थंडी-ताप, थकवा, संधीवात, पोटदुखी, पित्त, मूळव्याध, कावीळ, जंत, गर्भाशयाची सूज, दमा, आतड्यांचे विकार, चेहऱ्यावरील मुरूम आणि पुळ्या जाण्यासाठी तसेच सुजेच्या जागी गजगा उगाळून लेप लावल्यावर सूज कमी होते. या झाडात बोंड्यूसीन नावाचे कटुद्रव्य असते. फळे शक्तिवर्धक आणि ज्वरनाशक आहेत. यात कटू, उष्ण, वातरोग, शोध, यकृतरोग, प्लिहारोग, विरेचक, वातानुलोमक गुणधर्म असतात.

अनेक आजारांवर रामबाण उपाय असलेली ही वेल वर्गीय झुडूप वनस्पती आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच जमिनीची धूप थांबवण्यास याची मोठी मदत होते. पक्षी घरटे बांधण्यासाठी या झाडाचा जास्त प्रमाणावरती वापर करतात. त्यामुळे या झाडांच्या परिसरात पक्ष्यांचा अधिवास वाढत जातो. अगदी कमी पाण्यावर येणारी वनस्पती आहे सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून दरवर्षी जास्तीत जास्त वन क्षेत्राच्या बांधावरती मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पुन्हा या झाडांच्या बियांपासून रोपांची पुनर्निमिती केली जाते
- दयानंद अवघडे, वनरक्षक, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, बारामती

03393

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com