दोन वर्षांपासून फरारी आरोपीस इंदापूर पोलिसांकडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षांपासून फरारी आरोपीस
इंदापूर पोलिसांकडून अटक
दोन वर्षांपासून फरारी आरोपीस इंदापूर पोलिसांकडून अटक

दोन वर्षांपासून फरारी आरोपीस इंदापूर पोलिसांकडून अटक

sakal_logo
By

इंदापूर, ता. २८ ः गेल्या दोन वर्षांपासून विविध गुन्हे दाखल असताना फरार असलेल्या आरोपीस दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.

याबाबत फरारी आरोपी पकडण्याबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देत पथक तयार करण्यात आले होते. पथकाने आरोपी सुमीत ऊर्फ बंटी सुधीर सोनवणे (वय ३२, रा. आंबेडकर नगर, ता. इंदापूर, जि. पुणे) यास इंदापूर गावच्या हद्दीत गलांडवाडी नंबर दोन येथे उमेश क्षीरसागर यांच्या फार्म हाऊसवरून ताब्यात घेतले.

पोलिस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे,
पोलिस हवालदार अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, गुरू जाधव, राजू मोमीन, धीरज जाधव, काशिनाथ राजापुरे, मुकुंद कदम आदींनी कारवाईत भाग घेतला.