Thur, June 1, 2023

बेशिस्त वाहनधारकामुळे इंदापुरात वाहतूक कोंडी
बेशिस्त वाहनधारकामुळे इंदापुरात वाहतूक कोंडी
Published on : 1 April 2023, 10:05 am
इंदापूर ता. १ : इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावर बसस्थानक समोरील परिसरात एका चारचाकी वाहनधारकाने रस्त्यातच वाहन उभे करून निघून गेल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. याचा फटका सर्वसामान्य नागरिकासह या भागातील व्यापारी व वाहनचालकांना बसला.
शुक्रवारी (ता.३१) दुपारी शहरातील बसस्थानकासमोर पुणे सोलापूर महामार्गावर एका चारचाकी वाहनधारकाने आपले वाहन उभे करून निघून गेल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. यामुळे एसटी बसेस, खासगी वाहने, शालेय विद्यार्थी यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. जवळपास अर्धा तासाने वाहतूक पोलिस या ठिकाणी आल्यानंतर वाहतूक कोंडी सोडविण्यात आली.