सेन्ट्रींग प्लेट चोरीप्रकरणी 
निमगावातील दोघांवर गुन्हा

सेन्ट्रींग प्लेट चोरीप्रकरणी निमगावातील दोघांवर गुन्हा

इंदापूर, ता. २६ : इंदापूर शहरातील कसाब पेठ येथील मयुर अपार्टमेंट येथून रात्रीच्या वेळी ८० हजार रुपये किमतीच्या सेन्ट्रींग कामाच्या १०० प्लेटा चोरून नेल्याप्रकरणी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील दोन व्यक्तींविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील शरद महादेव बनकर (रा. निमगाव केतकी) यास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मनोज महादेव बनकर हा फरारी आहे.
याबाबत आकाश खरात (रा. कसबा पेठ, इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शरद बनकर व मनोज बनकर हे सेंट्रिंग कामासाठी प्लेट भाड्याने मागण्यासाठी १२ एप्रिल रोजी आले होते. मात्र, खरात यांना अनेक बांधकामांवर प्लेट द्यायचे असल्याने त्यांनी प्लेट दिल्या नाहीत. त्यांनतर आरोपी बनकर यांनी १९ एप्रिल रोजी पुन्हा प्लेट मागण्यासाठी गेले. त्यावेळी कामगारांनी सांगितले की मालक घरी नाहीत. त्यावेळी खरात यांच्याकडे १५० प्लेट शिल्लक होत्या. मात्र, ते प्लेट भाड्याने दिले असल्याने बनकर यांना दिले नाहीत. त्यांनतर दुसऱ्या दिवशी प्लेट मोजले असता त्यातील १०० प्लेट गायब झाले होते. त्यांनतर फिर्यादी यांनी निमगाव केतकी येथील आरोपी बनकर यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्यांना पाच सेंन्ट्रीग प्लेट त्यांच्या घरासमोर दिसून आल्या. त्यावरून त्यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com