इंदापूरमध्ये १४ जागांसाठी लढत

इंदापूरमध्ये १४ जागांसाठी लढत

इंदापूर, ता. २७ : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८ जागांपैकी बिनविरोध झालेल्या ४ जागा वगळता उर्वरित १४ जागांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होत आहे. त्यासाठी इंदापूर, वडापुरी, बावडा, निमगाव केतकी, शेळगाव, जंक्शन, सणसर, कुरवली, पळसदेव, भिगवण या १० गावांमध्ये २० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे. पी. गावडे यांनी दिली.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेपैकी अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी आमदार यशवंत विठ्ठल माने, व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागांसाठी दशरथ नंदू पोळ, रौनक किरण बोरा व हमाल मापाडी मतदार संघाच्या एका जागेसाठी सुभाष ज्ञानदेव दिवसे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १४ जागांसाठी दोन पॅनेल व काही अपक्ष, असे एकूण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये गेली आठवडाभर शेतकरी विकास पॅनेल व स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेल या दोन्हीही पॅनेलच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांचा फैरी झाडत प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. शनिवारी मतमोजणी आहे. एकूण २० केंद्रांवर १२० कर्मचाऱ्यांचे नेमणूक करण्यात आले असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ४० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

४ हजार ३२२ मतदार
इंदापूर बाजार समितीसाठी एकूण ४ हजार ३२२ मतदार मतदानासाठी पात्र असून, यामध्ये २५० सोसायट्यांचे सोसायटी मतदारसंघातून ३ हजार १३१ मतदार, तर ११६ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत मतदार संघातून १ हजार १९१ मतदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com