वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

sakal_logo
By

इंदापूर, ता.३ : काळेवाडी नंबर २ (ता. इंदापूर) येथील सोलापूर-पुणे महामार्गावर बस स्थानकाच्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला. त्याचे वय अंदाजे ४ ते ५ वर्षांचे होते. या घटनेमुळे काळेवाडी परिसरात बिबट्या वास्तव्यास असल्याबाबत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला काळेवाडी बस स्थानकाजवळ मंगळवारी (ता.२) रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात वाहनाने बिबट्यास जोरदार धडक दिली. यामुळे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. काही वेळात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच इंदापूर वन परिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी, वनपाल गावटे वनरक्षक कांबळे, वनमजूर महादेव झोळ यांसह महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, पोलिस हवालदार उमेश लोणकर, पोलिस हवालदार भानुदास जगदाळे, पोलिस नाईक नितीन वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृत बिबट्याचे शव वन विभागाने पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले.