Thur, Sept 28, 2023

दोन गटात मारामारी; २१ जनांवर गुन्हा
दोन गटात मारामारी; २१ जनांवर गुन्हा
Published on : 14 May 2023, 2:46 am
इंदापूर : इंदापूर शहरात बेकायदेशीर जमाव जमवून दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हातात काठ्या व कोयते घेऊन दंगल घडवून आणली. या प्रकरणी दोन गटातील सुमारे २१ जणांवर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस हवालदार विनोद लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस कर्मचारी लोखंडे यांना शुक्रवारी (ता.१२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाणदरा नाल्याजवळ सूरत साडी सेंटरसमोर हाणामारी सुरू असल्याची माहिती मिळाली असता पोलिस हवालदार विनोद लोखंडे, पोलिस हवालदार गजेंद्र बिरलिंगे, हवालदार समाधान केसकर हे तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून संबंधितांना ताब्यात घेतले व गुन्हा दखल केला.या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन तांबे करत आहेत.