''रियल''मधील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''रियल''मधील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर
''रियल''मधील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर

''रियल''मधील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर

sakal_logo
By

शिर्सुफळ : ता: १५ : बारामती एमआयडीसीमधील रियल डेअरी प्रायव्हेट लिमिटेड मधील कर्मचारी यांना पाच हजार ते दहा हजार रुपयांची वार्षिक वेतनवाढ कंपनी प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. वेतनवाढीचे पत्र कंपनी प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
या प्रसंगी रियल डेअरीचे अध्यक्ष मनोज तुपे, कार्यकारी संचालिका अनिता तुपे, प्रेसिडेंट प्रशांत अपराजित, एच आर मॅनेजर सुशांत शिर्के, फायनान्स मॅनेजर प्रीतम पारखे, प्रवीण तावरे, राहुल जाधव, योगेश जगताप, अजित कदम, महेश बेलदार, विशाल भापकर, परशुराम इरकर, अशोक सोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. वाढती महागाई, शासनाचे बदलते धोरण, बाजारपेठ मधील मंदी, वाढती स्पर्धा आदी कारणाने दूध डेअरी क्षेत्रातला आर्थिक फटका बसत असताना सुद्धा रियल डेअरीच्या प्रगतीत कर्मचारी व अधिकारी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने सदर वार्षिक वेतन वाढ कंपनी प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असल्याचे अध्यक्ष मनोज तुपे यांनी सांगितले.

03751