सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुप्रिया सुळे आज
इंदापूर दौऱ्यावर
सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर

सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर

sakal_logo
By

इंदापूर, ता. १७ : खासदार सुप्रिया सुळे या गुरुवारी (ता. १८) इंदापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत नागरिकांच्या अडीअडचणी व विकासकामांसंदर्भात संवाद साधणार आहेत. त्यांच्यासह माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली.
या दौऱ्यात पडस्थळ, पिंपरी खुर्द/शिरसोडी, कालठण नं. २, गलांडवाडी नं. १, बिजवडी, वरकुटे बुद्रुक येथे महिला बचत गटांना प्रमाणपत्र वाटप करणार असून, करेवाडी, कालठण नं. १, आगोती नं. २, कळाशी, बळपुडी येथे भेटी देणार आहेत.