वरंगळी येथे अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरंगळी येथे अपघातात 
ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
वरंगळी येथे अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

वरंगळी येथे अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

sakal_logo
By

इंदापूर, ता. १९ ः पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरंगळी गावच्या हद्दीत पुण्याच्या दिशेने विटा घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात घडला. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान विटा भरलेला ट्रॅक्टर घेऊन चालक धनाजी दादासाहेब शेवाळे (वय 45 रा. करेवाडी ता. इंदापूर जि. पुणे) पुण्याच्या बाजूकडे निघाले होते. यावेळी वरंगळी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह दुभाजक ओलांडून पुणे सोलापूर रस्ता ओलांडून कडेला पलटी झाला. यात चालक धनाजी दादासाहेब शेवाळे यांचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.