
डिझेल चोरीप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल
इंदापूर ता. १९ ः इंदापूर ते सराटी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर काम करणाऱ्या पोकलेनमधून डिझेल चोरीप्रकरणी पोकलेन ऑपरेटर संजयकुमार रामरक्षा शर्मा व त्याचा साथीदार राजेंद्र ललुप्रसाद शर्मा (दोघे रा. मूळ बजौडी ता. करसुआलाल जि सिंगरोली राज्य -मध्यप्रदेश) यांच्यावर इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एन. पी. एन्ट्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीमध्ये साइड सुपरवायझर म्हणून नोकरी करणाऱ्या पांडुरंग हरिदास मासाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीचे इंदापूर ते सराटी हा पालखी महामार्ग बनविण्याचे काम चालू आहे. गुरुवारी (ता. १८) रात्री ३च्या सुमारास मोटारसायकलवर इंदापूर ते सराटी पेट्रोलिंग करत असताना सराटी गावच्या हद्दीत रोडवर कामास असलेले पोकलेन मशिन बंद असल्याचे दिसल्याने पोकलेन मशिनच्या जवळ जाऊन पाहिले असता पोकलेन मशिनचे ऑपरेटर संजयकुमार रामरक्षा शर्मा व राजेंद्र ललुप्रसाद शर्मा हे पोकलेन मशिनचे डिझेल टँकमधून छोट्या पाइपच्या साह्याने डिझेल ड्रममध्ये चोरत असल्याचे दिसले. त्यावेळी त्या दोघांनी पोकलेन मशिनचे डिझेल टँकमधून एका २० लिटर मापाचे ड्रममध्ये चोरून काढले असल्याचे दिसले. यावरून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.