‘अहिल्याबाई होळकर’च्या निकालात मुलींची बाजी

‘अहिल्याबाई होळकर’च्या निकालात मुलींची बाजी

इंदापूर, ता. २५ ः इंदापूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व कला शाखेचा बारावीचा निकाल ८९.५८ टक्के लागला. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला शाखेचे १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यामध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक स्वप्नाली ब्रह्मदेव कदम - (७६.१७ टक्के), द्वितीय क्रमांक सानिका संजय चव्हाण (७० टक्के) व तृतीय क्रमांक अनिल रामदास मंजुळे (६६.३३ टक्के) तर कला शाखेमध्ये अश्विनी गणेश कदम यांना प्रथम, राम नवनाथ इंगोले यांना द्वितीय तर, आदित्य युवराज मखरे तृतीय क्रमांक मिळवला.

सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व प्राचार्या अनिता साळवे यांचे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांनी अभिनंदन केले. तसेच या वेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com