इंदापूरला वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरला वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्‍घाटन
इंदापूरला वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्‍घाटन

इंदापूरला वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्‍घाटन

sakal_logo
By

इंदापूर, ता. २८ : ‘‘वंचित बहुजन समाजाला आपला विकास साधायचा असेल तर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा’’ असे आवाहन वंचित बहुजन आघाडी पुणे पूर्वचे अध्यक्ष राज कुमार यांनी केले.
गाव तिथे शाखा अंतर्गत इंदापूर शहरात सिद्धिविनायक नगर, अंबिकानगर, संत सावतामाळी नगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे शाखांचे उद्‍घाटन झाले. या वेळी राज कुमार बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे महासचिव मंगलदास निकाळजे सहसचिव गोविंद कांबळे, संपर्कप्रमुख ॲड. वैभव कांबळे, किरण मिसाळ, सुजय रणदिवे, मनोज साबळे, गौतम कांबळे, सुभाष खरे, राहुल कांबळे, संजय धिमधिमे, जमिल कुरेशी, पिनेल चव्हाण, रविकांत काळे, संतोष चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय साळुंखे, राहुल गुंजवटे, राहुल मखरे, युवराज झेंडे, सिद्धांत खरे, राजेंद्र साबळे, आशुतोष मखरे, नागेश थोरात, संघर्ष मखरे, प्रतीक मखरे यांनी प्रयत्न केले. उपस्थितांचे आभार कीर्तिकुमार वाघमारे यांनी मानले.