पुस्तकी ज्ञानाबरोबरच खेळाचे कौशल्य गरजेचे

पुस्तकी ज्ञानाबरोबरच खेळाचे कौशल्य गरजेचे

इंदापूर ता.२८ : ''मोबाईलच्या विश्वातून मुलांना बाहेर काढत पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धा शारीरिक कसरती यांचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. तरच सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडू शकतो'', असे प्रतिपादन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व इंदापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक भरत शहा यांनी केले.

इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्ट व इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट ॲकॅडमी याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ वे वार्षिक स्नेहसंमेलन,गुणवंत खेळाडू सत्कार समारंभ व उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोपप्रसंगी भरत शहा बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमोल रासकर, संस्थेचे आधारस्तंभ मुकुंद शहा, सुनील तळेकर, प्रमोद राऊत, अशोक चव्हाण, अक्षय सूर्यवंशी, अर्शद सय्यद, दत्तात्रेय व्यवहारे, जयश्री व्यवहारे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
नवीन भारताची पिढी सक्षम घडविण्याचे अविरत कार्य चालू असतानाच मुलांचे कौतुक व्हावे व इतर मुलांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलिसमध्ये भरती झालेल्या संतोष मारकड, काजल जाधव, प्रणाली दिवसे, पुनम करचे, भाग्यश्री नगरे, वृषाली बनसोडे, समीर मारकड तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू व ज्युदो या खेळामध्ये महाराष्ट्राला मेडल मिळवून दिलेल्या पृथ्वीराज जाधव, ओम हिंगमिरे, पार्थ भोई, साक्षी कांबळे, श्रावणी सिताप, आर्यन शेंडे, पूजा घनवट, महेश माने, प्रतीक व्यवहारे, अजित व्यवहारे, आयुष बळगानुरे, शुभश्री पोतदार, तन्मयी मरवडे, रचना बांडे, वर्षा बनसोडे, प्रज्योत काळे, रोहित शिंदे, तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अनिकेत व्यवहारे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. दत्तात्रेय व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले.
-
03855

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com