आम आदमी पक्षाची आज इंदापूर शहरात जाहीर सभा

आम आदमी पक्षाची आज इंदापूर शहरात जाहीर सभा

इंदापूर, ता.२८ : आम आदमी पक्षाची ''पंढरपूर ते रायगड'' ही स्वराज्य यात्रा आज सोमवारी (ता.२९) सकाळी इंदापूर येथे येणार आहे. शहरातून मार्गक्रमण करून नगरपरिषदेसमोर जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती पक्षाचे पुणे जिल्हा संघटनमंत्री अक्षय शिंदे यांनी दिली.
आम आदमी पक्ष जनसामान्यांपर्यंत पोचवणे, लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडणे, सत्तेतील वतनदारांना हटवून सर्वसामान्यांसाठी काम करणारे सर्वसामान्यांचे राज्य आणणे ही या यात्रेची उद्दिष्टे आहेत, असे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील, उपाध्यक्ष जनार्दन पांढरपिसे, हनुमंत वाघमोडे, आप्पा पाटील उपस्थित होते.
राज्याच्या सर्व भागातून आलेले ''आप''चे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी असणार आहेत. पंढरपूर येथून रविवार (ता.२८) यात्रेस सुरुवात झाली आहे. ही यात्रा पंढरपूर, इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, पनवेल, पाचाडगाव या मार्गाने जाऊन राज्याभिषेक दिनी ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर पोचणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com