इंदापूर शहरातून स्वराज्य यात्रा मार्गस्थ

इंदापूर शहरातून स्वराज्य यात्रा मार्गस्थ

इंदापूर, ता.२९ : आम आदमी पक्षाची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा इंदापूर शहरामध्ये सोमवारी (ता.२९) सकाळी दाखल झाली. यावेळी हलगीच्या निनादात जोरदार घोषणाबाजी करत शहराच्या विविध भागातून फेरी काढीत महापुरुषांना अभिवादन करत यात्रा पुढे मार्गस्थ झाली.
आम आदमी पक्षास जनसामान्यापर्यंत पोचवणे, लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडणे, सत्तेतील वतनदारांना हटवून सर्वसामान्यांसाठी काम करणारे सर्वसामान्यांचे राज्य आणणे ही उद्दिष्टे घेऊन पंढरपूर येथून सुरू झालेली यात्रा सोमवारी सकाळी इंदापूरमध्ये दाखल झाली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत टेंभुर्णी नाका, नेहरू चौक, मुख्य बाजारपेठ, अहिल्यादेवी चौक, ते नगरपरिषद येथे आली. यावेळी नगर परिषदेच्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून आम आदमी पक्षाच्या विविध योजनांची माहिती देणारे पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी गोपाल इटालिया, प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, धनंजय शिंदे, देवेंद्र वानखेडे, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद कीर्दक, जिल्हा सचिव अक्षय शिंदे एम.एम.पाटील, नांदेड जिल्हाध्यक्ष क्षीरसागर, इंदापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील, उपाध्यक्ष जनार्दन पांढरपिसे, हनुमंत वाघमोडे, अप्पा पाटील यांचेसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.


इंदापूर येथील आंदोलन कर्त्यांची भेट
इंदापूर नगर परिषदेसमोर गेल्या साठ दिवसांपासून थकीत घरपट्टी पाणीपट्टीवरील व्याज आकारणी तसेच इतर विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा देत शासन दरबारी प्रश्न लावून धरण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे, सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार, प्रदीप पवार, महादेव चव्हाण, अशोक ननावरे, संतोष जामदार उपस्थित होते.
-
03861

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com