इंदापुरात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
इंदापुरात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

इंदापुरात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

इंदापूर ता. ३० : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता.३१) इंदापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र रेडके, मार्गदर्शक पांडुरंग मारकड, निमंत्रक नानासाहेब खरात यांनी दिली.
‘‘इंदापूर न्यायालयाच्या समोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात होणार आहे. या कार्यक्रमास इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी सभापती विलासराव वाघमोडे, बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव राहुल मखरे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर, मुख्याधिकारी रामराजे कापरे, उपजिल्हा रुग्णालय इंदापूर वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले, डॉ. संतोष खामकर, पोपट पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे महेंद्र रेडके व नानासाहेब खरात यांनी सांगितले. या वेळी धनगरी ओव्यांचा कार्यक्रम, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा, ऑनलाइन वेशभूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार असल्याचे अनिता खरात यांनी सांगितले. सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.